Followers

Friday, July 28, 2017

अहिराणी भाषेचा इतिहास

अहिराणी भाषेचा इतिहास

"अहिराणी" भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे. हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु, आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. आणि या भाषेला तर आता "मृत भाषा" म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा .

मंडळी, अहिराणी भाषा म्हणजे श्री कृष्णदेवांचा आशिर्वाद आहे. महाभारतात खान्देशावर एक कथा आहे. श्री कृष्णदेव आणि जरासंध यांच्यात चौदा वेळा युद्ध झाले. तेरा वेळा श्री कृष्णदेवांचा विजय झाला. चौदाव्या युद्धात मात्र जरासंधाला विजय मिळाल्यावर जीव वाचवण्यासाठी देव मथूरेहून द्वारकेला पळाले, म्हणून त्यांस "रणछोडदास" असे म्हणतात.

हे रणछोडदास द्वारकेकडे जात असतांना रस्त्यात खांडव वन लागले. इथे त्यांनी काही वर्षे मुक्काम केला. ते पशूपालांचा राजा असल्यामुळे त्यांच्या सोबत असंख्य मेढपाळ व गोपाळांचा समूह होता. खांडव वनात चारा पाणी भरपूर होते. मैलोनमैल जमीन होती. या ठिकाणी हे पशूपाल खुपच रमले.

या पशूपालांना "अहिर" म्हणत. आणि त्यांची बोलण्याची भाषा म्हणजे "अहिराणी" भाषा होय.

पुढे द्वारकेच्या दिशेने जायचे ठरल्यावर काही लोकांनी नकार दिला. कृष्णदेवांच्या संमतीने त्यांनी खांडव वनातच वसाहत निर्माण केली. आपल्या लाडक्या राजाचे नाव या प्रदेशाला दिले. कन्हैयाचा कान्हदेश. पुढे याच कान्हदेशाचा अपभ्रंश खान्देश असा झाला.

या कान्हदेशाची राजधानी नंद राजाच्या नावावरून वसवली. तिचे नाव नंद दरबार व पुढे याचा अपभ्रंश नंदुरबार असा झाला .

खान्देशात महाभारतातील कौरव, पांडवाच्या नावावरून तर भरपूर गावे आहेत.

आणि ती पुढीलप्रमाणे : -

 नन्द राजाच्या नावावरून नंदान
 धर्म च्या नावावरून धमानं
 भीमच्या नावावरून बामनं
 अर्जुन च्या नावावरून जूनून
 जयद्रथ च्या नावावरून जैतान
 श्रीधर च्या नावावरून शिरधार
 मुकुंदा च्या नावावरून कुंडान
 गोविन्दा च्या नावावरून वैदान
 अस्वत्थामा च्या नावावरून आस्तान
 बलराम च्या नावावरून बळसान
 दुशासन च्या नावावरून दूसान

अशा प्रकारची नावे गावांची आहेत व त्या समोर त्यांची अपभ्रंश झालेली नाव आहेत तर काही नाव जशीच्या तशी आहेत.

श्रीकृष्णाचा चुलता म्हणजे उध्दवाचे वडिल देवभान हे नाव जसच्या तस एका गावाच आहे.

भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याच नाव सारंग धनुष्य होते. या नावाच गाव दोंडाइचे आणि शहाद्याच्या मधे तापीच्या काठावर आहे. याच जागी भगवान श्रीकृष्ण धनुष्य बाणाचा सराव करायचा त्याच मैदानात त्याने नारायणी सेना घडवीली.त्या जागेवर जे गाव वसले त्याच नाव "सारंगखेडा" ! या ठिकाणी महानुभाव पंथियांचा दत्त आहे त्याची मोठी यात्रा भरते. तो त्रिमुखी दत्त नसून एकमुखी दत्त म्हणजेच दत्तात्रय !

प्रभु म्हणजेच श्रीकृष्ण ! श्रीकृष्णाची जात अहीर होती. अहीर म्हणजे गवळी ! हे अहीर लोक जी भाषा बोलतात ती अहिराणी ! अहिरांची भाषा ती अहिराणी.

अशी ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारण की, हि एक वीरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले.

भक्तप्रल्हाद, बळीराजा, सितेची आबरू वाचवण्यासाठी बलिदान करणारा घृधराज महाबली जायल(जटायू). अर्जूनापेक्षाही वरचड असलेला धनुर्धारी निषाध राजा एकलव्य, रामभक्त शबरी भिल्लिण, दरभंग रूषी, पवनपुत्र हनुमान ही सर्व मंडळी खान्देशी होती.

महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.

राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा वीर बालक शिरीष कुमार खान्देशी होता.

अशा या पावन भूमीवर महान अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे), रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड), डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील (डांगरी), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी (अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना.चौधरी (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर).हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत.

परंतु, आज याच अहिराणी मातेवरती खुप वाईट दिवस आले आहेत. आज तिच्याच काही पुत्रांना जन्मभूमी बद्दल ज्ञान नाही. अतिशय मायाळू असणार्‍या या आईचे तिचेच काही पुत्र तिरस्कार करत आहेत.

मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे.

आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवा..

मना गाव... मना देश... खान्देश 

रहस्यमय जगन्नाथ पुरी

🌷 *रहस्यमय जगन्नाथ पुरी* 🌷

    जगातली सर्वात मोठी रथयात्रा पुरीमध्ये भरते. पंढरपूरपेक्षा खूप अधिक भक्त ईथे एकत्र येतात. पुरीचे आणि इथल्या जगन्नाथाचे न उलगडलेले  रहस्य आणि भक्तांची श्रद्धा:-

     जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांचे शरीर शोधून त्याचा दाहसंस्कार केला. इतर सर्व शरीर जळून गेले पण हृदय जळतच राहिले. नंतर तो पिंड नदीच्या पाण्यात सोडण्यात आला. त्या पिंडाचा त्या जळत्या हृदयामुळे एक लगदा तयार झाला. राजा इंद्रद्युम्न याला तो लगदा मिळाला, त्याने तो लगदा भगवान जगन्नाथाची मूर्ती तयार करून त्यात ठेवला आणि मंदिरात स्थापन केला.

दर १२ वर्षांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती बदलली जाते, परंतु मूर्तीच्या आतील तो लगदा आजपर्यंत कोणीही पहिला नाही. जे पुजारी मूर्ती बदलतात त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि हात सुद्धा कापडाने गुंडाळले जातात. त्यामुळे आजपर्यंत कोणीही त्या लगद्याला पाहू शकला नाही किंवा त्याचा स्पर्श अनुभवू शकला नाही!

 असे म्हटले जाते कि भगवंताच्या हृदयाच्या लगद्याला जो कोणी पहिल त्याचा  तात्काळ  मृत्यू होईल कारण त्या हृदयात ब्रह्मदेव आहे आणि प्रचंड तेज आहे जे कोणीही सहन करू शकणार नाही.

    ज्या दिवशी जगन्नाथाची मूर्ती बदलली जाणार असते त्यादिवशी सरकारकडून संपूर्ण पुरी शहरात वीज बंद करून अंधार केला जातो. 'मूर्तीत श्रीकृष्णाच्या हृदयाचा लगदा आहे का?' हि बाब एक रहस्यच आहे!

१> भगवान जगन्नाथाच्या मंदिरावरील ध्वज नेहमी हवेच्या विरुद्ध दिशेला फडकतो, म्हणजे हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असेल तर झेंडा पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकतो, असे का होते, हे शास्त्रज्ञ पण सांगू शकले नाहीत!

२> मंदिराच्या कळसाच्या ठिकाणी असलेले सुदर्शन चक्र पुरीमध्ये कुठेही उभा राहून पाहता येते आणि कुठूनही पहिले तरी असेच वाटणार कि हे सुदर्शन चक्र आपल्या समोरच आहे!

३> सर्वत्र पहिले तर असे आढळून येते की, दिवसा वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात पण पुरी याला अपवाद आहे, इथे नेमकं याच्या उलटे होते दिवसा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात!

४> भारतातल्या बहुतेक सर्व मंदिरांच्या शिखरांवर पक्षी बसलेले दिसून येतात परंतु जगन्नाथाच्या मंदिराच्या आजवरच्या इतिहासात एकही पक्षी मंदिर शिखर परिसरात फिरकला नाही!

५> मंदिराच्या सिंहद्वारातून आत प्रवेश करताच समुद्राचा आवाज येणे पूर्णपणे बंद होतो. मात्र संपूर्ण पुरीमध्ये अन्य कुठेही जावा, समुद्राचा आवाज येतच असतो!

६> अन्य बहुतांश मंदिरात श्रीकृष्ण आपल्या पत्नीसमवेत विराजमान असतात पण या मंदिरात मात्र ते आपले भाऊ बळराम आणि बहीण सुभद्रे सहित विराजमान आहेत!

७> मंदिराच्या शिखराची उंची २१४ फूट आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे दिवसाच्या कोणत्याही क्षणी त्याची सावलीच कुठे  पडत नाही!

         *लीला अपरंपार*
         *जय  जगन्नाथ*

💐🌷🌹💐🌷🌹💐🌷🌹

जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे

*व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;*
- संकलन-राजेंद्र बैरागी

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!

नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!

जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.*  

*ग्रामपंचायत*

एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.

* *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 1अ* - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

* *गाव नमुना नंबर - 1ब* - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1क* - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.

* *गाव नमुना नंबर - 1ड* - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 1इ* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 2* - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 3* - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.

* *गाव नमुना नंबर - 4* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 5* - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6* - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6अ* - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6क* - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 6ड* - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7* - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा,आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 7अ* - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8अ* - या नोंद
वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 8ब, क व ड* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 9अ* - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 10* - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 11* - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 12 व 15* - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 13* - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 14* - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 16* - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 17* - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 18* - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

* *गाव नमुना नंबर - 19* - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 20* - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

* *गाव नमुना नंबर - 21* - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते.
© Pravin Patrekar यांच्या वॉल वरून साभार

अक्षयत्रितीया

           

अक्षयत्रितीया :  आकीदी ....  ....युगादी.....

•         अक्षय = अमर , क्षय न होणारा .

•         त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.

•         त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .

•         परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )

•         पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.

•         श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ केला.

•         भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण, स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.

•         श्री बसवेश्वर जयंती , . श्री आध्य शंकराचार्य जयंती. ,

•         श्री नरनारायण आवतार.  श्री हायग्रीव आवतार.

•         या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.

•         याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, आशी आख्याईका सांगतात की श्रीलक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर )  कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी  सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा  मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाध्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त

करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केलफ़ तो हाच दिवस.  या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे

हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.

•         म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्षिमीदेवीची पूजा करून  पूरणावरणाचा नैवैध्य दाखवितात.

•         दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .

•         पुण्य गोळा करण्याचा दिवस.भूतकाळ विसरण्याचा दिवस.

•         सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.

•         वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.

सर्वांना अक्षय त्रितीयेसाठी  हर्दिक शूभेच्छा  !!! ......

अक्षय्यतृतीया, आखाजी

आखाजी- सासुरवाशीणींचा सण!
आज अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेउन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्‍या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देउन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेउन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबर्यावर उमटवत आणी एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/ आता गॅसवरच 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासुन आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.
खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!
माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेउन, विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.

चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय
वैशाखाचं उन्हं
खडक तापुन लाल झाले वं माय
तापुन झाले लाल
आईच्या पायी आले फोड वं माय
पायी आले फोड
आईची बेगडी वाव्हन वं माय
बेगडी वाव्हन
तठे काय कन्हेरानं झाड वं माय
कन्हेरानं झाड

माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस,पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथार्‍या टाकल्या जातात..गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं
कैरी तुटनी खडक फ़ुटना, झुयझुय पानी व्हायं वं

झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना ब