Followers

Tuesday, October 11, 2016

जमिनीवर बसून जेवायचे फायदे

*🔺जमिनीवर बसून जेवायचे फायदे🔺*

*1 :-  पचन सुधारते* 

जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते  या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

*2 :- वजन घटवण्यास मदत होते*

जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}

*3 :- लवचिकता वाढवत*े 

पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

*4:-  मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते*

जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

*5 :- कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते*

दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.

*6 :- शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते*

शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

*7 :- दीर्घायुषी बनवते* 

ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.

*8 :- गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात*

Yoga for Healing या  पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.  पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.

*9:-  चंचलता कमी होते *

मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.

*10:- हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो*

काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

*📝 ज्ञानामृत मंच*

विजयादशमी किंवा दसरा महत्व

दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात?

           भारतीय संस्कृती नुसार प्रत्तेक सण साजरा करण्या मागे काही ना काही विज्ञान आहे. सण साजरा करता करता मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक व शारीरिक प्रगती होत राहावी अशीच आपल्या सणांची रचना आहे.

           आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.

               दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्‍याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्‍तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्‍तींवर दैवी शक्‍तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.

शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्‍याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. दसर्‍याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.
२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.
३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)
४. शमीकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.
५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा तेजलहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो

           तसेच आपट्याचे झाड हे जंगलात व माळरानावर वाढत असते,त्याचे आयुर्वेदिक महत्व जास्त आहे. त्याची पाने व फांद्या कापल्याने त्या झाडाचे कोणतेही नुकसान होत नाही तर त्याला आणखीन फुटवे फुटतात व त्याची वाढ आणखी जोमाने होते. सहाजिकच आपट्याची पाने वाटल्याने पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही.
निसर्गाची फारच काळजी वाटत असल्यास आपट्याची झाडे लावा

Wednesday, October 5, 2016

 घट्स्थापनाः पारंपारिक व शास्त्री  कृषक  संस्कृती

🌱घट्स्थापनाः पारंपारिक व शास्त्री  कृषक  संस्कृती. 🌾🌾🌾

🌱बिजपरिक्षण, पाणी परिक्षण, माती परिक्षण, आणी हवामान परिक्षणाची पारंपारिक चिकित्सा पध्द्ती.

🌱घट्स्थापना ही बळीराजाने निर्माण केलेली बियाणे, माती, पाणी आणी हवामानाची चिकित्सा करणारी पारंपारिक परंतु शास्त्रीय दृष्टीकोण असणारी पद्धती आहे.

🌱घट्स्थापना करतो म्हणजे आम्ही नक्की काय करतो?

🌱प्रथमता एक पळसाच्या पानाची पत्रावळी ठेवली जाते. त्यावर शेतातील काळी माती ठेवली जाते. या मातीत विविध प्रकारचे बियाणे मिसळले जाते. त्यावर एक कच्च्या मातीचा घट ठेवला जातो. या घटामध्ये नऊ दिवस रोज पाणी घातले जाते. नवव्या दिवशी तळी उचलुन घटाचे विसर्जन केले जाते. 

🌱आता या प्रक्रियेतील शास्त्रीय चिकित्सा पाहुयात.

🌱घट स्थापना ही पावसाळ्याच्या शेवटच्या दिवसात आणी रब्बी पिकांचा हंगाम सुरु होण्या आधी केली जाते.

🌱घटा साठी वापरण्यात येणारी माती ही शेतातील काळी माती वापरली जाते. परंतु ही माती इतर कोणाच्या शेतातील घेतली जात नाही तर शेतकरी आपल्याच शेतातील किंबहुना ज्या शेतात तो रब्बी पिक घेणार आहे त्याच शेतातील माती वापरली जाते.

🌱कारण ज्या शेतात तो पिक घेणार आहे त्या शेतातील मातीचे हे परिक्षण असते.

🌱या मातीत मिसळलेले बियाणे हे कोणतेही बियाणे वापरले जात नाही तर रब्बी हंगामात जे पिक शेतकरी त्याच्या शेतात  पेरु शकतो तेच आणी त्याच्याकडे उपलब्ध असणारे बियाणेच शेतात टाकले जाते. त्या मागचा हेतु त्याच्या शेतात वापरले जाणा-या बियाणाची उगवण क्षमता किती आहे हे तपासणे असते.

🌱घटामध्ये नऊ दिवस जे पाणी घातले जाते ते कुठलेही वापरले जात नाही तर शेतकरी त्याच्या शेतासाठी ज्या जलस्त्रोत्राचे पाणी वापरणार आहे त्याच जलस्त्रोत्राचे पाणी घटामध्ये घातले जाते. घट हा मातीचा आणी कच्चा भाजलेलाच वापरला जातो. तो इतर कोणत्याही धातुचा वापरायचा नसतो. कारण घटामध्ये ओतलेले पाणी सतत पाझरणे आवश्यक असते जेणे करुन त्याच्या खाली शंकु आकारात ठेवलेल्या मातीत  आणी त्यात टाकलेल्या बियांना रुजण्यासाठी त्याची उपलब्धता होते.

🌱 घट नऊ दिवसच बसवला जातो त्याचे कारण बियांना रुजुन अंकुर बाहेर पडण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागतो.

🌱 घटामधील बियाणांची उगवणक्षमता रोज तपासली जाते. परंतु नवव्या दिवशी शेजारील पाच व्यक्तिंकडून तळी उचलली जाते म्हणजे  घटामध्ये उगवून आलेल्या पिकाची पहाणी केली जाते.

🌱जे पिक जोमाने आले आहे ते पिक शेतात पेरण्यासाठी सर्वानुमते निवडले जाते. या सर्वानुमते घेतलेल्या निर्णायाला चांगभल, येळकोट अशा घोषणा देवून सर्व मान्यता दिली जाते. सर्वमान्य असलेले पिक उदो उदो करुन उपटले जाते.

🌱या उपटलेल्या पिकाचा तुरा शेतकरी आपल्या टोपी किंवा फेट्याच्या शिरपेचात खोचतो किंवा त्याची अंगठी करुन हातातही बांधली जाते. त्यामुळे घरोघरी घेण्यात आलेल्या परिक्षणाचे निकाल एकत्र करुन अभ्यासने सोपे जाते.

🌱 गावातील सार्वजनिक ठीकाणी एकत्र येवून त्याच दिवशी गाव शिवारातील पिक पाण्याचे नियोजन केले जाते.

🌱या सर्व प्रक्रियेत माती, पाणी आणी बिज परिक्षण जसे होते त्याच बरोबर या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे याचे पण परिक्षण केले जाते.

🌱माझ्या शेताच्या मातीत,  माझ्याकडे उपलब्ध असलेले बियाणे , माझ्या शेताला उपलब्ध असलेल्या पाण्यावर , या वर्षीचे हवामान कोणत्या पिकाला पोषक आहे या सर्वांची चिकित्सा करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणारी पारंपारीक परंतु शास्त्रावर आधारलेल्या या चिकित्सा पध्दतीची जोपासणा देवाधर्माच्या नावाखाली रसातळाला जावू न देता तेवढ्याच शास्त्रीय पध्दती ने जोपासा

Monday, October 3, 2016

श्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य

🌺🙏🌺श्री सप्तशृंग निवासिनि राजराजेश्वरी सप्तशृंगी देवीबाबतचे काही रहस्य🌺🙏🌺

1 गडावर साग ,काग,नाग दिसत नाही गडाच्या आजुबाजुला भरपुर सागाची झाडे असुन सुध्दा
जंगल परीसर आहे तरी नाग दिसत नाही
आणि कावळयाचे दर्शन फार दुर्मीळ

2 देवी मध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी ह्या त्रिगुणात्मिका आहेत
ह्या मीळुन देवीचे स्वरुप आहे

3 वणी गडावर सप्त मातृका हि आहेत
1 शिवा 2 चामुण्डा 3 वाराही 4 वैष्णवी 5 इंद्राणी 6 कार्तिकेयी 7 नारसिंही
ह्या सात योगमाया गडाच्या सात शिखरावर क्रमाने विराजमान आहेत

4 गडावर मच्छिंद्रनाथाना देवीने शाबरी विद्येचे धडे दिलेत त्याची समाधी ही गडावर आहे

5 सप्तशृंग गडा द्रोणागीरी पर्वताचाच एक भाग आहे
राम रावण युध्दात लक्ष्मण जख्मी झाला तेव्हा हनुमंताना द्रोणागीरी आनण्यास सांगीतले
द्रोणागीरी आणतांना त्याचा काही भुभाग सह्याद्री पर्वतात पडला तोच भुभाग म्हणजे सध्याचा
सप्तशृंग गड

6 गडावर संजिवनी बुटी आहे पण कलियुगात आईसाहेबांनी ती गुप्त स्वरुपात ठेवली आहे

7 देवीच्या दारी औदुंबराची छाया आहे तेथे दत्त दिगंबर भेटीसही येतात
त्या औदुबंराखाली शुभ्र नागराज असुन त्याच्या मस्तकात शक्तीशाली हिरा आहे

9 राम सिता लक्ष्मण वनवास काळी पंचवटीत आले तेव्हा गडावर आईसेबांचे नीत्य दर्शनास येत असत

8 देविच्या द्वारी कासव आहे कासवीन जसी प्रेमळ नजरेन आपल्या पीलांचे पालन पोषन करते
तसे आई भगवती आपल्या भक्तांचा सांभाळ करते
आणि कासव गती ने दर्शनास यावे असेही सांगते
घाई गर्दि करु नये हाही त्यामागील उद्देश आहे

11 ज्ञानेश्वराची ही कुलस्वामिनी आहे त्याचे मोठे बंधु निवृत्तीनाथ हे समाधी घेण्यापुर्वी वणी गडावर आले होते
भगवती च्या आदेशानुसार त्यानीं त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली
त्याना सप्तशृगी माते मध्ये त्याची वीठुमाउली दिसली होती

10 नाथ सांप्रदायाची ही कुलस्वामिनी आहे नवनाथाची शाबरी विद्या हीचीच देणगी आहे

12 गडावर तीर्थराज शिवालय आहे ब्रम्हदेवाच्या कमंडलु मधुन जे पाणी वाहीले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला तीच गीरिजा(सध्याची गिरणा नदी) नदी आणी त्यापासुन हे तीर्थ तयार झाले ह्यास गीरीजा तीर्थ ही म्हटले जाते
ह्या कुंडात सर्व देवानीं स्नान केले होते असे हे पापविनाशक तीर्थ आहे

13 ह्या तीर्था शेजारी श्री शंभुराज विराजमान आहेत
तसेच कुंडावरती अर्धनारी नटेश्वर आहे त्याचा संबध किन्नरांशी आहे

14 किन्नर येथे कोजागीरी ला खुप मोठया प्रमाणात हजेरी लावतात
देवीच्या सेवे साठी कृष्णाने किन्नराना धरती वर पाठवले आणि सांगितले त्या आदिमायेच्या कृपेन तुम्ही भक्ताची संकटे स्वत:वर घ्याल आणि तुमची सेवा श्री भगवती पर्यंत पोहचेल तुमचा उध्दार होइल

(स्रि ला मासिक धर्म असतो पुरूषा स त्याची कामे
किन्नर हा सर्व काम पाशापासुन मुक्त असतो त्यात शिव आणी शक्ती दोघांचा एकत्रीत मीलन असते (अर्धनारीनटेश्वर) म्हणुन त्यानी केलेली सेवा लवकर आईसाहेब चरणी रुजु होते )

तसेच शरद पौर्णिमा ही शापमुक्ती देणारी पौर्णिमा आहे आणि आईचा जागर घालण्यासाठी ही मंडळी येते
आणि आईकडे मागणे मागते पुढचा जन्म व्यवस्थित द्यावा आणि ह्या जन्माचे सार्थक व्हावै

15 डावर 108 कुंड होती काही बुजली गेली सध्यस्थितीत काहीच कुंडे अस्तीत्वात आहेत

17 कालीका तीर्थ हे कुंड कपारीत असुन ह्याचे पाणी थंड आहे

16 तांबुल तीर्थ जेथे भगवती ने पानाचा वीडा खाउन थुखंली होती
आणी चुळ भरली होती ते तीर्थ
गडाच्या पश्चिमेला आहे
तसेच ह्य कुंडाचे पाणी ही तांबडे आहे

देवीच्या मुखातील विडयाला खुप मान आहे खुप कमी देवी आहेत ज्याना विडा भरवला जातो

गडावर दैनंदीन देवीला वीडा भरवला जातो आणी दुसरया दिवशी
तो वीडा भक्ताना दिला जातो
भाग्यवान भक्ताला वीडा मीळतो
आणि तो वीडा खायला सांगतात पण थुंकायचा नसतो

19 सुर्यतीर्थ ह्या कुंडाटचे पाणी उष्ण असते तिन्ही रुतु मध्दे

18 काजळ तीर्थ देवीने डोळ्यातील काजळ येथे धुतले होते ह्या कुंडाचे पाणी काळेशार आहे

20 सप्तशृंग पर्वताशेजारी नादुंरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे असे सांगतात की देवी दैत्य युध्दात देवीने त्रिशुलाने ते खिंडार पाडले आहे

21 दैत्याला नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वणी गडावर आला तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी ही मानता आहे

22 दैत्य मारुन आदिशक्ती सप्तशृंगी त्या दैत्यांच्या रक्तान नहाली होती म्हणुन ती रक्तवर्णा आहे

23 महिषासुर वधानंतर ती तांडव करु लागली तीचा क्रोध शांत करण्यासाठी शंकर मासांच्या ढिगार्यात पडुन राहीले त्याच्या छातीवर देवीने पाय दिला तेव्हा तीने विचार केला
पाय पडुनही हाडांचा चुरा झाला नाही ही छाती पतीची असावी
आणि पती वरती पाय ठेवल्यामुळे
अरे रे नवरा असे म्हणुन तीने जीभ बाहेरही काढली होती

तीचा क्रोधावर नियंत्रण रहावे म्हणुन शिवशंभु गडावर विराजमान आहेत

24 युध्दामुळे थकलेले हे रुप विसावा घेण्यासाठी रम्य अशा वणी डावर आले
आणि 18 हातासह विसावले

25 मार्कंडेयानीं देवीची स्थापना केली असे सांगतात

26 मार्कंडेयानीं तीच्या स्वरुपाची व्याप्ती केली तीला रुपास आणले
आणि रक्तवर्णीय आदिमाया स्वरुपास आली

27 मार्कंडेय मुणी च्या काळी दुष्काळ पडला होता तो हिवाळयात
म्हणुन मार्कंडेयांचे बंधु ह्यानी देवीचा अभीषेक थांबु नये म्हणुन कावडी ने पाणी आणुन नित्य देवीचा अभीषेक केला, कावडीची सुरुवात शरद पौर्णिमे पासुन केली म्हणुन भक्त कधीही दुष्काळ पडु नये म्हणुन
कोजागीरीस कावड आणतात आणी देवीचा अभीषेक करतात

29 गडावर खैराचा वृक्ष आहे त्यावर शाबरी विद्येच्या तांत्रिक 52 देवता विराजीत आहेत पण तो वृक्ष उदृष्य स्वरुपात आहेत
पण योग्य उपासनेने तो जागृत होतो

28 देविने दैत्याचा हाडाचा चुरा केला त्यापासुन हळद बनवीली
आणि त्यापासुन कंकू
आणि सांगीतले की जी स्रि कुकंवासह हळद लावेल ती प्रेत योणी पासुन वाचेल

30 गडपठारावर ध्वज लावण्याची खुप जुनी परंपरा आहे तो मान
दरेगावच्या गवळी परीवाराचा आहे त्यांच्या पिढयानपीढया ही भगवतीची सेवा करीत आहे

11 वार झेंडयाचे निषाण असते ते घेउन गवळी परीवाराती एक जण ज्याला पठारावर जाण्याचा रस्ता माहीत आहे ती व्यक्ती
झेंडा घेउन जाते पण कुणालाही ते कळत नाही की ती व्यकती कुठून जाते ते

एका परदेशी जानकाराने सांगीतले की दुरबिनीने बघीतले असता गडाला झेंडा घेउन जाणार्या रस्त्यावर कातळावर पायर्या त्याला दिसुन आल्या
पण गड कातळावर पायर्या नाहित

31 देवीच्या पाठीमागे दुसरी देवी आहे असे काही लोकांचे मानने आहे
पण ते साफ खोटे आहे देवीची जी मुळ मुर्ती आहे तीच खरी मुर्ती
आणि देवी पाठी मागे काहीमते शक्तीपीठाचे स्थान आहे तेथे नैवेद्या दिलाजातो आरती च्या आधी देवीला पडदा लावला जातो तेव्हा त्या स्थानी नैवेद्य दिला जातो

32 देवीचे मंदिर पुर्वी रात्री लवकर बंद राही अशी मानता होती की
सिंहराज देवीच्या भेटीला नीत्य येत
त्याच्या डरकाळी चा आवाज स्पष्टपणे ऐकु यायचा असे तेथील आदिवासी सांगत

33 श्री सप्तशृंग निवासिनि भगवतीस चामुण्डा ही म्हटले जाते
तीचा मंत्र ही आहे
ॐ ऐं र्हिं क्लीं चामुण्डाए विचै
देवीमुर्ती च्या वरती चांदीमध्ये कोरला आहे

म्हणुन काहीच्या मते गुजरात मधील चोटीला चामुण्डा आईसाहेब सप्तशृंगीचेच रुप असावे अशी मानता देखील आहे

ही आदिशक्ती गुजरात राज्यातील बहुतेक कुळांची कुलदेवता आहे
तसेच मध्यप्रदेश महाराष्ट्र दक्षिण भारतीयांची ही कुलदैवत आहे

35 सप्तशृंग क्षेत्र पुर्वीचे दंडकारण्य होय
ह्या पर्वताला सात शीखर असल्याने ह्यास सप्तशृंग म्हणतात

आणि सात शृंगार केलेली देवी आणि सप्त शीखरावर विराजीत आहे म्हणुन तीला श्री सप्तशृंग निवासिनि सप्तशृंगी म्हणतात

34 ॐ काराचे अर्धे चंद्र स्वरुप सप्तशृंग क्षेत्री पुर्ण होते म्हणुन हे अर्ध शक्तीपीठ होय
हि माता येथे बिंदुस्वरुपिनी आहे
ॐ म्हणजेच आदिशक्ती स्वरुप होय आणि आदिशक्ती ने सर्व विश्व व्यापले आहे

36 देवीची नकळत कलती मान आहे
समोर मार्कण्डेय मुणी सप्तशतीचे पाठ वाचतायेत आणि आईसाहेब कान देउन ऐकतायेत
थकव्या मुळे मान झुकली आहे आणि डावा हात कानावर ठेवुन आदिशक्ती मार्क॔ण्डय मुणींचा कथासार ऐकत आहे

38 ह्या आदिमायेची न्यारीच कला आहे ही सकाळी बाला , मध्यदिवसावर तारुणी दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृध्दा भासते

37 देवीचे माहेर खांन्देश आहे आणि तीचे सासर वणी आहे अशी मानता आहे तीकडे तीचे ध्यान ही आहे
असे म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात तेव्हा तीचे स्वरुप अधिक खुलते
आणी जेव्हा माहेरची मानस परतीला निघतात तेव्हा आई रडकी होते

39 गडावर रडतोंडी नामक वाट आहे नांदुरी हुन गडावर जायला
महिषासुर वधानंतर आईसाहेब वणीगडावर विश्रांती साठी आल्या असता डोंगर दर्यांचा भाग मग जी अवघड वाट चढतान्ना आईसाहेब चक्क रडल्या म्हणुन त्या वाटेला रडतोंडी असे म्हणतात

ह्या रडतोंड्या 3 आहेत
1 नादुरी मार्ग
2 वणी मार्ग
3 मार्कण्डेय पर्वताकडुन येणारा रस्ता

40 आदिमायेचे हे स्वरुप दृष्टिस पडले ते सर्वप्रथम गवळी बांधवाला
तो गाई चारण्यास गडावर येत असे त्याची एक गाय अचानक गायींमधुन निघुन अवघड अशा स्थानी चरण्यास जायी
हे त्याने कित्यांदा बघीतले
तो तेथे गेला मग त्याला तेथे भले मोठे मधाचे पोळ दिसले तो खुश झाला पण मधाच्या पोळात काठी खुपसली असता काठीच्या टोकाला शेंदुर लागलेला दिसुन आला
मग झाड पाचोळा बाजुला केल्यावर त्याला आदिमायेचे स्वरुप दृष्टिस पडले

आदिमाया बोलती झाली की
`` मी ह्या गडावर आधीच होते माझी पुजा करणार कोणी नव्हते माझ्या दर्शनाचे भाग्य तुला लाभले आता माझी नीत्य पुजा होणार तुझ्या गवळी घराण्याला कधीही हाणी पोहचणार नाही

आणि मग भक्ता देवीच्या दर्शनाला यायला लागले देवीचा महीमा दुरवर पसरला स्थानिक दिक्षीत आणि देशमुख कुंटुबीय पिढयानपीढया देवीच्या सेवेत आहे

तसेच गवळी परीवाराला ध्वजाचा मान मीळाला

41 सप्तशृंगी मंदिराच्य दुसर्या टप्प्यात परतीच्या मार्गावर श्री कालभैरव महाराज विराजमान आहेत
आदिशक्तीच्या संरक्षणा साठी ते तेथे आहेततसेच गडावर मारुती आणि इतर अकरा रुद्र ही आहेत

42 तसेच चितांमणी म्हणुन एक दगडाचा भाग आहे तेथे भाविक पैशे चिकटवुन मनातील इच्छा बोलतात
रुपया चिकटला तर इच्छा पुर्ण नाही चिकटला तर काहीच नाही अशी भाविकांची श्रध्दा आहे

43 गडासमोर एक पर्वत आहे त्यास मार्कण्डेयाचा पर्वत असे म्हणतात तेथे मार्कण्डेत ऋषींचा आश्रम ही होता येथेच बसुन मार्कण्डय ऋषींनी दुर्गा सप्तशती हा अनमोल ग्रंथाचे लिखान केले अशी मानता आहे
हा मार्कण्य पर्वत एक किल्ला ही आहे मार्कंडा म्हणुन ओळखला जातो..👏👏👏🙏👏👏👏

HISTORY OF LEVA PATIL

HISTORY OF LEVA PATILS
Lewa Patil :
The origin of Lewa Patils, at an essential time, came from defence duty (Kshatra Karma). At other times it means agriculture (Krushi Karma) and hence from the beginning they were treated as warriors (Kshatriya).

Lewa :
The sect which is the origin from 'Lava' is called Lewa. The lineage of Ikshwanku, Suryavanshi, living in Ayodhya established new city in Punjab. The name Lahore came from Lava. At present Lahore which is on the bank of Ravi is in Pakistan. This is the original place of Lava sect. The Lava sect which conquerred that part of Punjab is called Leva Region. The people there even now are called Leva. According to some authorities, Lava was born in the 40th generation of Survansh and according to some other authorities Lava was born to Sita from Ram in the 66th generation of Survansh.

After the conquest of region of Punjab Leva Pradesh of Lava sect was conquerred by Irani Gurjar Gang and so this part is known as 'Gujrat Subha'. The Leva Gurjars and Leva Kurmees living in Saurashtra at present have come from this area.

55 generations lived there after Lava. In 144 A.D. these Levas came from Punjab-Gujrat and Leva Province into Saurashtra and therefore Saurashtra got the name of Gujrat. But they left the Punjab in 78 B.C.

Patidar :
According to authorities the word Patidar has different meanings:

Patidar :
An officer of some part or area. According to Patel 'Pati' also means
group or branch during the regime of Mohammad Begada. The Kunbi means cultivator of the land. Therefore he did not give up the land. Patt means part of the land and Patidar means Tax Collector. Patil means chief of the village (Reference Dr. Soni's book page No. 69 if "Marathi Aadnave''.

The word Patil also came from 'Patkil'. Patu means Clever and patta means Chief. The person who established the village used to become Patil. Patil used to become known because of Village recognition. Patil was not a government post or self occupied post. Because of virtues and works, the person used to become Patil. Later on this post became hereditary. Patil became Village King and he got Government honour. Even after getting many posts - the Sardars means soldiers - did not give up Patilship.

Patilship was awarded because of career. This society of Kunbi being the ancestor of Lava and owner of the land is called as Patil. Thus Leva Patil became the name of the cast. Leva Kunbi, Leva Patil, Patidar, Kunbi, Rava, Rava Kunba etc. . Thus this cast is knows by the above names. The Leva Patils belonged to two province (Pargana). Khandesh province (Pargana) and Vidarbha provice (pargana). Each province (pargana) had Bhorgaon Panchayat. The head of this province (pargana) got government rights (Deshmukhi rights). The chief of Khandesh Leva Province (pargana) was Deshmukh, the Thorgavane Deshmukh of Yawal . The chief of Vidarbha Leva Province (Pargana) was Varade of Datala - Dudhalgaon Budruk. He was Vatandar Deshmukh.

In the Leva Pargana of Khandesh, the Thorgavane Deshmukh of Yawal lost recognition of his leadership. He remained the chief of Thorgavan branch and the Savadekar Leva branch of Khandesh, Navghare and Kandarkar - in these three branches the leadership went to Bhortek and thereafter it went to the Police Patil of Padalse. This change took place during the British regime and therefore Police Patil of Padlase did not get Deshmukhi. On the contrary, in Vidarbha Province Varade Panchayat chief of Datala, Dhudalgaon Budruk from Deshmukh family got it because of the confidence and support of Leva Patils. Datala Dudhalgaon Bk. chief named Varade got the leadership of Leva province of Vidharbha. The family chief (Kutumb Nayak) of Jat Panchayat and Deshmukhi continued with him but the Government dismissed Deshmukhi Vatan and so the work of Leva Panchat decreased day by day. The Family Chief of Bhor Panchyat of Deshmukhi of Leva Province became things of the past - Ref. Maharashtra State Gazatier, Dist. Jalgaon,

Saturday, October 1, 2016

Leva Patil Vadhu Var Melava 2016

Leva Samaj Vadhu var parichay melavyanchya dates. Aurangabad:-16/10/16
Nashik  :-  12/11/2016
Pimpri Chinchvad  :- 13/11/2016
Pune  :-  26/11/2016
Mulund  :-  27/11/2016    Dombiwali:-20/11/16
Jalgaon :-  27/11/2016  Busawal:-16/11/2016

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो…
हीच देवीला प्रार्थना…
शुभ नवरात्री !
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…