अक्षयत्रितीया : आकीदी .... ....युगादी.....
• अक्षय = अमर , क्षय न होणारा .
• त्रितीया = चंद्रमासाचा तिसरा दिवस.
• त्रेता युगाचा प्रथम दिवस . ( त्रेता युगाची सुरूवात ) .
• परशुरामाचा जन्मदिवस (परशुराम चिरंजीव )
• पांडवांना वनात असतांना श्री कृष्णांनी सूर्य थाळी दिली...अक्षय पात्र.
• श्री गणेशांनी महर्षी व्यासांच्या विनंती वरून महाभारत लिहीण्यास प्रारंभ केला.
• भगीरथाच्या अथक प्रयत्ना नंतर गंगावतरण, स्वर्ग लोकातून गंगा पृथ्वीवर या दिवशी आली.
• श्री बसवेश्वर जयंती , . श्री आध्य शंकराचार्य जयंती. ,
• श्री नरनारायण आवतार. श्री हायग्रीव आवतार.
• या दिवसा पासुन श्री बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात.
• याच दिवशी श्री सुदामा श्रीकृष्णांना भेटावयास गेले, आशी आख्याईका सांगतात की श्रीलक्ष्मीदेवीने त्यांच्यावर ( सुदाम्या वर ) कृपा करण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीकृष्णांनी सांगितले की तो योग सुदाम्याच्या सांप्रत भाग्यात नाही. पण श्री लक्ष्मीदेवीच्या इच्छेचा मान ठेवण्यासाठी भगवंतांनी सुदाम्याची पाध्य पूजा केली व कुंकू लवण्याचे निमित्त
करून जुनी भाग्यरेषा पुसून नविन भाग्यरेषा कढली त्यामुळे मग श्री लक्ष्मीदेवीने सुदाम्याला भरभरून आशिर्वादित केले व त्याचे दारिद्र्य कायमचेच नष्ट केलफ़ तो हाच दिवस. या कर्म प्रधान विश्वात परमेश्वराने कोणाचे भाग्यच बदलले याचे
हे एकमेव उदाहरण आहे असे म्हणतात.
• म्हणुन हा दिवस श्री लक्ष्मीदेवीला कायमचे घरी आणन्याचा माणतात व श्री लक्षिमीदेवीची पूजा करून पूरणावरणाचा नैवैध्य दाखवितात.
• दान धर्म करण्याचा दिवस. ( कारण दिल्याने श्री लक्ष्मीतत्व वाढते ) .
• पुण्य गोळा करण्याचा दिवस.भूतकाळ विसरण्याचा दिवस.
• सर्वांना क्षमा करण्याचा दिवस.
• वाईट सवयी टाकून चांगल्या सवयी लावून घेण्याचा दिवस.
सर्वांना अक्षय त्रितीयेसाठी हर्दिक शूभेच्छा !!! ......
No comments:
Post a Comment